Saturday, 7 March 2015

मसीहा

Anand Shitole यांची एक पोस्ट वाचली . भक्तांवर होती ती . लोकांना फक्त मसीहा लागतो आणि मसीहा काही चुकला कि लोक नव्या मसीहा च्या शोधात असतात . किती दिवस आपण नवीन मसीहा शोधणार आहे ?? या जगात एकही माणूस परिपूर्ण नाही त्यामुळे तुम्हाला तुमचा मसीहा मिळणे अशक्यच मात्र योग्य मुद्द्यावर योग्य नेत्याला समर्थन द्यायला शिका आणि जर तुमचा लोकप्रतिनिधी चुकत असेल तर त्याला वठणीवर आणायला सुद्धा शिका आता . काही लोक म्हणतात याने काय होणार ....इथे सारख्या पसरणाऱ्या अफवांमुळे लोक आपली मते बदलून एखाद सरकार सुद्धा निवडून आणतात तर हि लोक योग्य त्या गोष्टींसाठी चांगल काम करू शकणार नाहीत का ??

No comments:

Post a Comment