आज होळी आहे .. दिवसभराच्या गणगणीत विसरलो होतो .. संध्याकाळी घरी जाताना मात्र कळल कि आज होळी आहे आणि त्यसाठी गल्ली गल्लीत लाकडे गौर्या एकत्र करून पेटवून द्यायच्या . पण एवढी उर्जा फुकट वाया घालवायची ????? प्रदूषण होत ते वेगळच .. एक मात्र खर एवढ्या लाकडे आणि गौर्यानी एका खेड्याच वर्षभराच चुल पेटवण्याच काम होऊ शकल असत ..असो .. आपल्या टाळक्या मध्ये असल्या फालतू गोष्टींची होळी करावी अस का येत नसावे बरे ??
— Sujit Ramdas Dharrao
Saturday, 7 March 2015
मसीहा
Anand Shitole यांची एक पोस्ट वाचली . भक्तांवर होती ती . लोकांना फक्त मसीहा लागतो आणि मसीहा काही चुकला कि लोक नव्या मसीहा च्या शोधात असतात . किती दिवस आपण नवीन मसीहा शोधणार आहे ?? या जगात एकही माणूस परिपूर्ण नाही त्यामुळे तुम्हाला तुमचा मसीहा मिळणे अशक्यच मात्र योग्य मुद्द्यावर योग्य नेत्याला समर्थन द्यायला शिका आणि जर तुमचा लोकप्रतिनिधी चुकत असेल तर त्याला वठणीवर आणायला सुद्धा शिका आता . काही लोक म्हणतात याने काय होणार ....इथे सारख्या पसरणाऱ्या अफवांमुळे लोक आपली मते बदलून एखाद सरकार सुद्धा निवडून आणतात तर हि लोक योग्य त्या गोष्टींसाठी चांगल काम करू शकणार नाहीत का ??
हक्क-कर्तव्ये आणि आपण (rights-duties and We)
सगळेच सारखे नसतात , नसावेत आणि नसणार सुद्धा . मात्र राज्यघटनेने आपल्याला हक्क दिले आहेत तसेच कर्तव्ये देखील सांगितली आहेत . तसेच निसर्गाने जेवढे हक्क दिले आहेत तसेच काही कर्तव्ये सुद्धा . तुमची मते किंवा आवड कोणत्या प्रकारची असू द्या मात्र कर्तव्याची जाणीव नक्की ठेवा .
All people aren't same , mustn't be same and will not be same too . Nature has given rights as well as duties , just like our constitution . Keep those duties in mind though your opinion or interest is different .
Subscribe to:
Comments (Atom)